Monday, 21 September, 2020

जाहिरात

बंगलोरमध्ये सोशल मिडीयाच्या पोस्टवरून दंगल


बंगलोर:- सोशल मीडियामधील एका पोस्टवरून भडकलेल्या जमावाने पोलीस स्टेशन आणि कॉंग्रेस विधायाकाच्या घरावर हमला केला. पोलिसांना गोळीबार करावा लागला, यात दोघांचा मृत्यू झाला तर ११० लोकांना अटक करण्यात आली असून, शहरात १४४ कलम लागू करण्यात आले आहे.

सविस्तर:- पुल्केशीनगर भागाचे कॉंग्रसचे विधायक अखंड श्रीनिवास मूर्ति यांच्या भाच्याने सोशल मिडीयावर कथित वादग्रस्त पोस्ट टाकल्यानंतर मंगळवारच्या संध्याकाळी मोठ्या संख्येने एका समुदायाचे लोक पोलीस स्टेशनवर धडकले. त्याची मागणी होती कि सोशल मिडीयावर टाकलेल्या वादग्रस्त पोस्टच्या विरोधात एफआयआर नोदवण्यात यावी. त्यांचे म्हणणे होते कि त्या वादग्रस्त पोस्टमुळे त्यांच्या धार्मिक भावना आहत झाल्या आहेत म्हणून त्यांना न्याय हवा आहे.

पोलीस स्टेशनवर गोंधळ चालू असतांना दुसरा जमावाने आपला मोर्च्या कॉंग्रेसच्या विधायक अखंड श्रीनिवास मूर्ति यांच्या घराकडे वळवला. इकडे आलेला जमाव इतका उग्र झाला कि त्यांनी तिथे उभ्या असलेल्या गाड्यांना आगीच्या हवाली करण्याचा सपाटा चालू केला. तसेच कॉंग्रेस विधायाकाच्या घराची मोडतोड करण्यास सुरवात केली.

पोलीस स्टेशनवर आलेला जमाव देखील उग्र झाला. त्यांनी पोलिसांवर मोठ मोठ्या दगडांनी हमला करण्यास सुरवात केली, त्यातच लाईट गेल्यामुळे जमावावर नियंत्रण मिळवणे कठीण झाले. परिस्थिती हाताबाहेर जात आहे हे लक्षात घेऊन पोलिसांना जमावावर गोळीबार करावा लागला.

कर्नाटकाचे गृहमंत्री बसवराज बोम्बई यांनी पोलिसांना शांतात प्रस्थापित करण्याचे आदेश दिले आहेत. तर दोघांचा गोळीबारामध्ये मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले आहेत. त्यांनी एक व्हिडीओ मेसेज द्वारे जनतेला शांतात पाळण्याचे आवाहन केले असून, आगजनी आणि हिंसा हे बेकायदेशीर कृत्य आहे, कारण काहीही असो कुणीही कायदा हातात घेता कामा नये, जो काही विरोध दर्शवायचा असेल तो कायद्याच्या कक्षेत असायला हवा, कितीही मोठी व्यक्ती ह्या कृत्याला जबाबदार असेना, सरकार त्याच्याविरोधात कठोर कारवाई करणार.

कॉंग्रेसचे विधायक अखंड श्रीनिवास मूर्ति यांनी देखील व्हिडीओ मेसेज जारी करून दुसऱ्या समाजाला आश्वस्त केले कि “ दोषी कुणीही असो, त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, तसेच तुमच्या भवनाचा आदर राखत मी स्वतः दोषी व्यक्तीवर कठोर कारवाई होईल हे सुनिश्चित करेन. विषय काहीही असला तरी आपण आपला भाईचारा टिकवून ठेवायला हवा. सामजिक सौधार्याला कुठेही ठेच पोहचणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे.”

कर्नाटक च्या अमीर-ए-शरियत हज़रत मौलाना सग़ीर अहमद यांनी देखील लोकांना शांतात पाळण्याचे आवाहन केले आहे. ह्या प्रकरणामध्ये जो कुणी दोषी असेल त्याला कायदा योग्य ती शिक्षा करेल, आपण कायदेशीर लढाई लढून न्याय मिळवू, त्यामुळे कुणीही कायदा हातात घेऊ नये.

बंगलोरचे पोलीस कमिशनर कमल पंत यांनी प्रसार माध्यमांना माहिती दिली कि डीगे हल्ली आणि केजी हल्ली ह्या भागात कर्फू लावण्यात आला असून शहरात १४४ कलम लागू करण्यात आले आहे. कथित पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढचा तपास चालू आहे.

बंगलोरचे जॉईन्ट कमिशनर (क्राईम) संदीप पाटील यांनी एनआय या वृत्तसंस्थेशी बोलतांना सांगितले कि ह्या प्रकरणामध्ये आतापर्यंत ११० लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे.

0 comments on “बंगलोरमध्ये सोशल मिडीयाच्या पोस्टवरून दंगल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: