Monday, 21 September, 2020

जाहिरात

फेसबुक-मुंबई पोलिसांच्या सतर्कतेने वाचवले तरुणाचे प्राण


Rashmi Karandikar, DCP Mumbai(Cyber Cell)

फेसबुकने आपल्या एका युजरच्या घडामोडीबद्दल संशय निर्माण झाला, त्याच्या घडामोडीतून आत्महत्याच्या दिशेने वाटचाल दिसून आली म्हणून फेसबुकने वेळीच मुंबई पोलिसांना सतर्क करून त्या तरुणाचे प्राण वाचवण्यात यश मिळवण्यात आले आहे – रश्मी करंदीकर डीसीपी मुंबई (सायबर सेल)

सविस्तर मुंबई:- एक तरुण फेसबुकवर काही संशयित घडामोडी करत होता, त्याच्या एकंदर हालचालीवरून आत्महत्या करण्याच्या प्रवृत्तीकडे कल दिसून आला. फेसबुकला जेव्हा त्याच्या हालचालीवरून हा आत्महत्या करणाच्या दिशेने वाटचाल करत आहे ह्याचा सुगावा लागल्यानंतर फेसबुकने त्याच्या मोबाईल नंबर वरून त्याच्या ठाव ठिकाणाचा मागोवा घेण्यात आला. ह्या तरुणाने आपल्या फेसबुक अकाउंटवर आपल्या पत्नीचा नंबर नोदावलेला होता, म्हणून त्याच्या पत्नीच्या नंबर वरून दिल्लीचा पत्ता घेऊन फेसबुकने दिल्ली पोलिसांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. तरुणाच्या पत्नीशी दिल्ली पोलीसानी संपर्क केला असता, आम्हा नवरा-बायकोच भांडण झाले आहे, मी दिल्लीला असून माझा पती मुंबईमध्ये आहे. ह्या माहितीच्या आधारे दिल्ली पोलिसांनी मुंबई पोलिसांशी संपर्क साधण्यात आला.

     मुंबई पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे मुंबई पोलिसांनी तरुणाच्या पत्नीशी संपर्क साधून, तिच्या मदतीने तरुणाशी संपर्क प्रस्थापित करून, त्याला आत्महत्येपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न सुरु झाला आणि दुसरीकडे त्याच्या लोकेशनचा ठाव घेऊन त्या दिशेने एक टीम रवाना झाली. त्याला सतत आत्महत्या करण्यापासून परावृत्त करण्याचा आटोकाट प्रयत्न करून त्या तरुणाचे प्राण वाचवण्यात मुंबई पोलिसांना यश मिळवण्यात आले आहे. त्यासाठी फेसबुक आणि दिल्ली पोलिसांचे आभार रश्मी करंदीकर डीसीपी मुंबई (सायबर सेल) यांच्याकडून व्यक्त करण्यात आले.

0 comments on “फेसबुक-मुंबई पोलिसांच्या सतर्कतेने वाचवले तरुणाचे प्राण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: