Monday, 21 September, 2020

जाहिरात

इनसे न हो पायेगा- नितीशकुमार


सुशांत सिंग राजपूत यांच्या आत्महत्या प्रकरणी पटना पोलिसांकडे सुशांत सिंग राजपूत यांच्या वडिलांनी FIR नोदावाल्यानंतर अचानक इलेक्ट्रोनिक मिडीयामध्ये स्पुरण संचारल्याप्रमाणे बिहार पोलीस विरुद्ध मुंबई पोलीस असा सामना रंगला किवा रंगवण्यात आला. ह्या प्रकरणाच्या माध्यमातून कार्यक्षेत्रा वरून बरीच चर्चा झाली, यावरून अनेक कायदेशीर मते मतांतरे मांडण्यात आले. अनेक कायदेतज्ञाच्या मते घटना मुंबई येथे घटीत झाल्यामुळे ह्या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडेच येतो तर बिहार पोलिसांनी नोदावलेली FIR ला Zero FIR गृहीत धरून ती FIR मुंबई पोलिसांकडे वर्ग करणे गरजेचे होते, परंतु बिहार पोलीस सिनेमे जास्त पाहतात कि काय ? किवां कायदेशीर तज्ञाची कमतरता आहे? अश्या प्रश्नाच्या हवाल्याने सिंघम वैगरे अश्या अविर्भावात बिहार पोलीस मुंबई मध्ये तर नाही ना असे चित्र मराठी जनतेमध्ये निर्माण होतांना दिसून येते आहे. बिहार पोलीस तपास करण्याच्या हेतूने BMW गाडी सोबत सर्व इलेक्ट्रोनिक मिडीयाचा लवाजमा घेऊन फिरत होते. त्यांच्या BMW गाडीच्या भटकंतीवर प्रश्नचिन्ह उभे राहायला लागलं म्हणून मग ऑटोरिक्षाची नौटंकी सुरु झाली, इकडे इलेक्ट्रोनिक मीडियातून बिहार पोलिसांची मुंबई सफारी प्रेक्षकांसाठी लाइव्ह चालू होती तर बिहार पोलिसांनी कोणती माहिती गोळा केली ती देखील प्रेक्षकांसाठी तात्काळ उपलब्ध होत होती. कळतंच नाही कि बिहार पोलीस तपास करत आहेत कि इलेक्ट्रोनिक मिडिया? बहुतेक बिहार पोलिसांची कामाची हीच पद्धत असायला हवी.

           सुशांत सिंग राजपूत यांच्या आत्महत्येनंतर मुंबई पोलिसांनी सुशांतच्या कुटुंबातील कुणीही तक्रार नोदवली नाही किवा ठोस अशी कुठलीही सूचना मुंबई पोलिसांना केली नसतानाही मुंबई पोलिसांनी भा.वी.द. १७४ प्रमाणे आकस्मिक मृत्यु बद्दल अवहाल तयार करण्यासाठी, करोना संक्रमण काळातही कसून तपास केला अनेक लोकांचे जबाब नोदवून घेण्यात आले. त्यात रिया चक्रवर्ती यांची १२ तास कसून चौकशी करण्यात आली. सुशांत सिंग राजपूत यांच्या चारही मानसोपचारतज्ज्ञ यांचे देखील जबाब नोद्ण्यात आले. इलेक्ट्रोनिक मिडीयामध्ये चित्रपट सृष्टीतील घराणेशाही आणि सुशांतला तथाकथित रित्या चित्रपट सृष्टीतून बेदखल करण्यात आलं यावरून जे वादळ उठले होते, त्या दिशेनेही मुंबई पोलिसांनी तपास करत अनेक चित्रपट सृष्टीतील मान्यवर लोकांचे जबाब नोदावले गेले तसेच कागदपत्रे तपासण्यात आलेत. मुख्यता मुंबई पोलिसांनी इलेक्ट्रोनिक मिडीयाला चघळायला विषय दिला नाही म्हणून इलेक्ट्रोनिक मिडिया मुंबई पोलिसांवर नाराज झाला असेल अशी शंका मनात येते. मुंबई पोलिस आपलं काम संपूर्ण व्यावसायिक मापदंडाच्या मर्यादेत पार पाळत आहेत. सर्वच माध्यमातून मुंबई पोलिसांवर शंका उपस्थित करण्यात आल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री. उद्धव ठाकरे हे मुंबई पोलिसांच्या मागे खंबीरपणे उभे राहिले. माननीय श्री. उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका मांडताना विरोधकांना खडसावून सांगितले कि मुंबई पोलीस ह्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी सक्षम आहेत आणि ते योग्य दिशेने तपास करत आहेत. मुख्यमंत्री माननीय श्री. उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेनंतर ह्या प्रकारणात गलिच्छ राजकारण सुरु झाले, महाराष्ट्र सरकारवर दबाव टाकण्यासाठी अतिशय खालच्या भाषेत आरोपांच्या फैरी झाळण्यात आल्या, तरी देखील महाराष्ट्र सरकारच्या भूमिकेत कुठलाही बदल झाला नाही आणि महाराष्ट्र सरकार मुंबई पोलीसंमागे ठामपणे आजही उभे आहे.

         ५ ऑगस्टला सुप्रीम कोर्टात सुशांत सिंग राजपूत प्रकरणावर सुनांवणी होती. त्याच्या पूर्वसंध्येलाच बिहारचे मुख्यमंत्री माननीय श्री. नितीशकुमार यांनी बिहार पोलिसांच्या तपासाचा अवहालाची प्रतीक्षा न करता ह्या प्रकरणाची चौकशी CBI मार्फत करण्याची शिफारस केंद्र सरकारकडे सुपूर्द केली. एकीकडे इतका दबाव सर्व बाजूनी टाकला जात असतांना देखील महाराष्ट्र सरकार आपल्या भूमिकेवर ठाम असतांना, बिहार सरकारने CBI चौकशीची शिफारस इतकी घाईघाईने घेतल्यामुळे अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. सुशासन बाबू म्हणून ज्यांची ओळख आहे ते बिहारचे माननीय मुख्यमंत्री श्री. नितीशकुमार यांना बिहार पोलिसांच्या क्षमतेवर साशंकता आहे का? कि बिहारचे माननीय मुख्यमंत्री श्री. नितीशकुमार यांनी बिहार पोलिसांच्या कार्यक्षमतेच्या मर्यादा लक्षात घेऊन हा निर्णय तर घेतला नसेल?  कि बिहार पोलिसांनी इलेक्ट्रोनिक मिडीयाच्या समोर तपासाच्या नावाने चालवलेली मुंबई सफारी आणि BMW ते ऑटोरिक्षा ह्या सर्व नौटंकी बघून, बिहार पोलिसांचे अजून वाभाळे बाहेर पडू नये म्हणून घाईघाईने CBI चौकशीची मागणी तर केली नसेल?, कायदेशीर बाबी पुढे येऊन बिहार पोलिसांची नाचक्की टाळण्यासाठी तर असा निर्णय घाईघाईने घेतला नसेल? एक ना अनेक प्रश्न मनात उपस्थित राहतात.

विनय तिवारी प्रकरण

बिहार पोलिसांचे आयपीएस अधिकारी विनय तिवारी सुशांत सिंग राजपूत प्रकरणाचा तपास करण्यासाठी मुंबईत आले असता बीएमसीच्या अधिकार्यांनी त्यांना इंस्टीटूशनल विलगीकरण कक्षात पाठवल्या प्रकरणी सुप्रीम कोर्टाने आपले मत व्यक्त केले होते कि “असे कृत्य चांगला संदेश नाही देत”, याचा आधार घेत बिहारचे उच्च पदस्थ पोलीस अधिकारी डीजीपी श्री. गुप्तेश्वर पांडे हे प्रसार माध्यमातून नेत्याप्रमाणे हास्यास्पद मत मांडताना झळकत आहेत, ‘भीमराव आंबेडकर यांचे संविधान,’ ‘सुप्रीम कोर्टाची अवहेलना,’ ‘लोकशाहीचा चवथा स्तंब आमच्या सोबत उभा आहे’ असे शब्द प्रयोग. बहुतेक श्री. गुप्तेश्वर पांडे राजकारणात प्रवेशाच्या तयारीत असतांना आज आपण उच्च पदस्थ पोलीस अधिकारी आहोत याचा त्यांना विसर पडला का? अशी मनात शंका निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. ह्या मुलाखतीनंतर बिहारचे मुख्यमंत्री माननीय श्री. नितीशकुमार यांनी CBI चौकशीची शिफारस करणे योग्यच आहे का? असाही प्रश्न मनाला भिडून गेला. जर  बीएमसीच्या अधिकार्यांनी बेकायदेशीर कृत्य केले असेल तर त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही व्हायला पाहिजे, हे सर्वांचेच मत आहे. जर कुठे संविधान विरोधक कृत्य घडले असेल तर ते निंदनीय आहे. मुंबई पोलीस मागील ५० पेक्षा जास्त दिवसांपासून ह्या प्रकरणाचा तपास करत आहे परंतु महाराष्ट्र सरकारला ह्या प्रकरणाचा तपास CBI कडे सोपवण्याची गरज भासली नाही. परंतु २५ जुलैला FIR झाल्यानंतर एकूण १०-१२ दिवसातच आपल्या पोलीस यंत्रणेचा क्षमतेवरील विशासाच्या आधारे बिहार सरकारला हा तपास CBI कडे सुपूर्द करावा लागला याबद्दल बिहार पोलीस दलाने आत्मपरीक्षण करण्याची गरज नाही का? इलेक्ट्रोनिक मिडीयाला TRP साठी सतत काही तरी खमंग, चटकदार, हवं असत म्हणून त्यांनी मुंबई पोलीस विरुद्ध बिहार पोलीस असा सामना रंगवला असला म्हणून बिहार पोलिसांनी देखील ह्या सामन्यात भाग घेण्याचे प्रासंगीक आहे का?

चंद्रशेखर पाटील    

0 comments on “इनसे न हो पायेगा- नितीशकुमार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: