Monday, 21 September, 2020

जाहिरात

नंदुरबार करोना अलर्ट -४ ऑगस्ट


नंदुरबार जिल्ह्याचे कलेक्टर श्री. डॉ. रांजेंद्र भारुड यांनी नंदुरबार जिल्ह्याच्या ४ ऑगस्ट रोजी ६६ नवीन करोना पॉझिटीव्ह रुग्णाबद्दलची माहिती प्रसार माध्यमांना जाहीर केली. तसेच ५ ऑगस्ट पासून अनलॉक प्रक्रियेचा भाग म्हणून अतिरिक्त शिथिलता देण्यात येत आहे त्या संदर्भात माहिती दिली.

कोरोना संक्रमित रुग्णाबद्दल माहिती

नवीन आलेल्या माहितीनुसार नंदुरबार शहर आणि तालुक्यातून सर्वाधिक एकूण ५० रुग्ण आहेत त्यात १ वर्ष्याच्या मुलीपासून ते ८० वर्ष्यांच्या महिलेपर्यंत अनेक वयोगटातील स्त्री आणि पुरुषाचा समावेश आहे. नंदुरबार शहरातील विविध भागातील रुग्णांसंदर्भात माहित खालील प्रमाणे आहे.  

कुंभारवाडा देसाईपूरा भागातून १४ रुग्ण असून त्यात ५ महिला ४ पुरुष आणि ४ मुली आणि १ मुलाचा समावेश आहे. बाहेरपूरा येथून एका ३० वर्षीय पुरुष रुग्ण आहे. रघुकूल नगर मधून एक ४३ वर्षीय पुरुष आणि ३८ वर्षीय महिलेसोबत १२ वर्ष्याच्या मुलाचा समावेश आहे. भाग्योदय नगर येथील २ महिला अनुक्रमे ८० आणि २२ वर्षे आणि २ मुली अनुक्रमे १ आणि १० वर्षे, साक्री नाका येथील 19 वर्ष वयाच्या तरुणी, नळवा रोड येथील ३४ वर्षीय पुरुष, नवापूर रोड येथील ४७ वर्षीय पुरुष, माळी गल्ली रनाळा येथील ५४ वर्षीय पुरुष, एलीसा नगर धुळे रोड ४९ वर्षीय पुरुष आणि  कमलकुंज नगर नळवा रोड येथील ६० वर्षीय पुरुष ह्या रुग्णांचा समावेश आहे.

नंदुरबार येथील विलगीकरण कक्षातील ३१ वर्षीय पुरुष, २८ वर्षीय महिला, ६ वर्षाची मुलगी आणि ४ वर्ष्याचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे.

तालुक्यातील रुग्णाबद्दल

नंदुरबार तालुक्यातील करजकुपा गावातील २ महिला १ पुरुष आणि ७ वर्ष्याच्या मुलाचा समावेश आहे. तलवाडे गावातील ४२ वर्षीय पुरुष आणि ३५ वर्षीय महिला हे दोन रुग्ण आहेत. शनिमांडळ गावातील एक पुरुष आणि ३ महिला रुग्णाचा समावेश आहे. तालुक्यातून सर्वाधिक विखरण गावात ३ महिला, ३ पुरुष आणि २ मुलांचा समावेश आहे.

0 comments on “नंदुरबार करोना अलर्ट -४ ऑगस्ट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: