Monday, 21 September, 2020

जाहिरात

जम्मू-कश्मीर, लडाख आणि गुजरातमधील जुनागढ पाकिस्तानच्या नकाश्यावर


जम्मू-काश्मीर लडाख आणि गुजरातमधील जुनागढ हे भू-भाग पाकिस्तानच्या आताच्या नकाशाला जोळून पाकिस्तानच्या नवीन राजकीय नकाशाचे मंगळवारी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी अनावरण केले. नकाशाला मंत्रिमंडळाची मान्यता मिळाल्यानंतर खान यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, “हा पाकिस्तानच्या इतिहासातील सर्वात ऐतिहासिक दिवस आहे.”

भारताकडून कठोर शब्दामध्ये इम्रान खान यांच्या कृत्याचा निषेध करण्यात आला आहे.  “ही बिनबुडाची राजकीय दुर्भावना असलेला, ज्यात भारतीय गुजरात राज्यातील जुनागळ, जम्मू-काश्मीर आणि लडाखच्या केंद्रशासित प्रदेश प्रांतावर अटळ दावे लावण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न आहे. हा दावा हास्यास्पद, कुठलीही कायदेशीर वैधता नसलेला किंवा आंतरराष्ट्रीय विश्वसनीयता नसलेलं पाऊल पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याकडून उचलण्यात आलं आहे.” असे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी एका छोट्या निवेदनात म्हटले आहे.

इम्रान खान यांनी जाहीर केलेल्या “तथाकथित राजकीय नकाशा” संदर्भात श्रीवास्तव म्हणाले, “खरेतर हा सीमापार दहशतवादाला पाठिंबा देण्यासाठी आणि सीमापार चालणाऱ्या आतंकी कारवायांना वृद्धिगत करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं आहे. हा पाकिस्तानचा “कार्टोग्राफिक मतिभ्रम” आहे.”

जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा काढून, जम्मू-काश्मीर आणि लडाख या दोन केंद्र शासित प्रदेशांमध्ये विभाजन करण्याचा भारतीय संसदेत कायदा मंजूर करण्याच्या पहिल्या वर्ष्याच्या वर्धापनदिनाचा निमित्ताने इम्रान खान यांची ही कारवाई केली आहे.

इम्रान खान यांच्या सरकारने पहिल्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमांची लांब यादी तयार केली असून यामध्ये चीन आणि तुर्कीसारख्या भागीदारांना निवेदने पाठविण्याची विनंती किंवा भारतावर टीका करणारे ट्वीट यांचा समावेश आहे. इस्लामाबादमधील काश्मीर महामार्गाचे नाव बदलून श्रीनगर हायवे असे ठेवण्यात येणार आहे. जम्मू-काश्मीरमधील भारतीय अत्याचारांविरोधात आवाज उठविण्यासाठी म्हणून कोरोनव्हायरस संबंधित एसओपीचे पालन करत एकता वॉक, फोटो प्रदर्शन आणि सेमिनार आयोजित केले जातील.

गेल्या एका वर्षात पाकिस्तानने जम्मू-काश्मीरच्या स्थिती बदल अनेक आंतरराष्ट्रीय डेस्कवर हा मुद्दा मांडण्याचा प्रयत्न सातत्याने केला परंतु जम्मू कश्मीर राज्याचे दोन नवीन  केंद्रशासित प्रदेशात विभाजनाच्या विरुद्ध त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरून कुठलाही पाठींबा मिळाला नाही. असे असले तरी ,इम्रान  खान यांचे सरकार त्यांच्या प्रयत्नांना एक मोठे यश मानते.

पाकिस्तान मध्ये इम्रान खान यांच्याबद्दल वाढता असंतोष, विकासा कामांची पूर्तता न करू शकल्यामुळे जनतेमध्ये वाढत जाणारा रोष इम्रान खान यांच्या “फौलादी भाई” या प्रतिमेला खंडित करत होता तसेच पाकिस्तानात बलुच आणि सिंधी फुटीरवादी संघटनांनी चिनी हितसंबंधांवर हल्ला करण्यासाठी युती करणार असल्याचे जाहीर केले आहे. २ जुलै रोजी बलूच राजी अजोई संगार किंवा ब्रॅस या चार बलोच फुटीरतावादी संघटनांचे सिंधुदेश रेव्होल्यूशनरी आर्मी किंवा एसआरए या आघाडीच्या सिंध प्रांतात कार्यरत असलेल्या थोड्या थोड्या ज्ञात अलगाववादी गटाशी युती करण्याची घोषणा केली. त्यामुळे पाकिस्तानमध्ये चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर याच्याबद्दल जनतेमध्ये रोष पाहण्यास मिळत आहे. या आणि  अश्या अनेक कारणामुळे इम्रान खान यांनी हे पाऊल उचलले असे पाकिस्तान विषयक अभ्यास करणाऱ्या तज्ञाचे म्हणणे आहे.

मंगळवारी पत्रकार परिषदेत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान बोलले कि , नव्याने बनवण्यात आलेल्या नकाशाला देशातील सर्व राजकीय पक्षांनी पाठिंबा दर्शविला असून जम्मू-काश्मीरमधील लोकांच्या मूलभूत हक्कांसाठी त्यांनी हे समर्थन केले आहे. “हा नकाशा गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये भारत सरकारच्या बेकायदेशीर कृत्याला विरोध दर्शवण्यासाठी आहे,” असे ते पुढे म्हणाले.

परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी नकाशाचे वर्णन “अभूतपूर्व पाऊल” असे केले.

ते म्हणाले, “इतिहासात प्रथमच आपल्या सरकारने जगासमोर आपली भूमिका उघडपणे मांडली आहे.”

0 comments on “जम्मू-कश्मीर, लडाख आणि गुजरातमधील जुनागढ पाकिस्तानच्या नकाश्यावर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: