Wednesday, 12 August, 2020

जाहिरात

सुशांतची वारी आरुषीच्या वाटेवर


सुशांत सिंग राजपूत आत्महत्या

सुशांत सिंग राजपूत या बॉलीवूड अभिनेत्याने १४ जून २०२० ला आपल्या राहत्या घरात आत्महत्या केली. जेव्हा पोलिसांनी त्याच्या घराची सखोल तपासणी केली तेव्हा त्यांना कुठलीही चिट्ठी किवा सुसाईड नोट आढळून आली नाही, त्यामुळे सुशांतच्या आत्महत्येचे खरे कारण त्याच्यासोबत अनंतात विलीन होऊन गेले. त्याच्या चाह्त्यांसोबत अनेकांना त्याच्या जाण्याने गंभीर आघात झाला. आत्महत्येमागील गूढ कुणालाही ठाऊक नसल्यामुळे जो तो आप आपल्या पद्धतीने कयास बांधायला लागला. सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर सुद्न्य, सुद्रुड आणि सुशिक्षित समाजाचा खरा चेहरा समोर यायला लागला. एका माथेफिरूने सुशांत सिंग राजपूतची आत्महत्येची बातमी आपल्या टिक-टोक अकाऊंटवर टाकून फोल्लो करण्याचे आवाहन केले. अनेक मान्यवर चित्रपट सृष्टीतील लोक आम्हाला त्याच्या मानसिक स्थितीची कल्पना होती पण वाटले नव्हते कि असं काही होणार म्हणून त्याच्या मृतुनंतर हळहळ व्यक्त केली. सुशांतच्या आत्महत्येला घराणेशाही जबाबदार म्हणून काही महाभाग सुशांतचे नाव घेऊन आपल्या लढाया उकरून काढू लागले.

सोशल मिडिया आणि सुशांत सिंग राजपूत आत्महत्या

सुशांत सिंग राजपूत यांनी आत्महत्या केल्यानंतर त्याच्या चाहत्यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून रान पेटवले, मग ते सुशांतच्या नजीकच्या लोकांनी व्यक्त होण्याचा मुद्दा असो कि सुशांत सिंग राजपूत यांची आत्महत्या कि हत्या असो की चित्रपट सृष्टीतील घराणेशाही असो किवा अप्रत्यक्ष काही लोकांची नावे सुशांत सिंग राजपूत यांच्या आत्महत्येशी जोळली जात होती त्यांच्यावर आग पाखाड उडवणे असो. यात महत्वाची बाब म्हणजे सुशांत सिंग राजपूत यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या चाहत्यांमध्ये कमालीची वाढ झाली, हि वाढ जवळ जवळ २.५ मिलिअन फोल्लोवर पर्यंत जाऊन पोहचली. सुशांत सिंग राजपूत यांच्या आत्महत्येला धडपड करणाऱ्या मध्यम वर्गीय युवकांचा प्रतिनिधी ह्या दृष्टीतून बघत चित्रपट सृष्टीतील प्रस्तापितांच्या विरुद्ध सोशल मिडीयाच्या माध्यमातून रान उठवण्यात आले. महत्वाचे म्हणजे सुशांत सिंग राजपूत यांची आत्महत्या निमितमात्र ठरत आहे आणि जन सामन्याच्या मनातील चित्रपट सृष्टीतील प्रस्तावित लोकांच्या विरोधातील भावनाचा उद्रेक सोशल मेडियाच्या मध्यातून व्यक्त होतांना दिसून येत आहे.

इलेक्ट्रोनिक मिडिया

सुशांत सिंग राजपूत यांच्या आत्महत्येनंतर ज्या पद्धतीने इलेक्ट्रोनिक मिडीयाने ह्या प्रकरणाला हाताळले त्यावर देखील अनेकांनी आक्षेप नोदवला मग त्यात “ऐसे कैसे हिट विकेट हो गये सुशांत”  किवां “पटना के सुशांत मुंबई में फेल कैसे हो गये” अश्या लाईन चालवणे असो किवां दुःखाचा डोंगर कोसळलेल्या कुटुंबियांना जाऊन “आपको कैसे महसूस हो रहा है” विचारणे असो किवां प्रार्थमिक तपासातून मिळालेल्या डिप्रेशनच्या गोळ्या आणि मानोचीकीत्साकांच्या फाईल वरून मनोविकार आणि त्यातून केलेली आत्महत्या याचे विवेचन ह्या सर्व बाबींवरून समाजाच्या अनेक घटकांनी आपली व्यथा बोलून दाखवली. तरीही इलेक्ट्रोनिक मिडीयाने कसलेही सामाजिक जबाबदारी न पाळता आपलं काम चालू ठेवले. मुंबई पोलिसांच्या तपासाचा मागोवा घेत इलेक्ट्रोनिक मिडिया आपलं टेबल वाजवण्याच काम करत राहिले. कोविड संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर आलेल्या परिस्थितीत तरुणांनी ह्या मुद्द्याला उचलून ठेवले आणि आत्महत्या कि हत्या, त्यात सुशांत सिंग राजपूत यांची कथित म्यनेजर दिशा सालीयान यांच्या आठवड्याभरा पूर्वी झालेल्या गूढ मृत्यूचा धागा पकडत अनेक रंजक कॉन्स्पीरसी थेअरी तयार व्हायला लागल्या आणि ह्या प्रकरणाचा तपास सीबीआय कडे वर्ग करण्यासाठी जोरदार मागणी उठू लागली.

बिहार पोलीस आणि मुंबई पोलीस

चित्रपट सृस्तीतील घराणेशाहीवर रान उठवले असताना सुशांत सिंग राजपूत यांच्या वडिलांनी पटना पोलिसांमध्ये त्याच्या कथित मैत्रीण रिया चक्रवर्ती व तिच्या परिवारातील लोकांविरुद्ध भा. वी. द. ३०६, ३४१, ३४२, ३८०, ४०६ आणि ४२० ह्या कलमानुसार गुंन्हा नोदवण्यात आला. बिहार पोलिसांनी कायद्यानुसार नोद्लेल्या गुन्ह्याला झिरो एफआयआर मानून ती एफआयआर मुंबई पोलिसांना हस्तांतरित करून नोद्लेल्या एफआयआर नुसार पुढील तपास करण्यास द्यायला हवं होत असं अनेक कायदे तज्ञाच म्हणणे आहे परंतु अतिशय नाटकीय अंदाजामध्ये सर्व घटनाक्रम घळताना दिसून येत आहे, रिया चक्रवर्ती सुप्रीम कोर्टमध्ये तपास मुंबईला हस्तांतरित करण्यासाठी याचिका दाखल केली आणि बिहार पोलीस मुंबईमध्ये फिरून तथ्य गोळा करत आहेत. सर्व घटनाक्रम मध्ये मुंबई पुलीस विरुद्ध बिहार पुलीस एकमेकांसमोर येऊन ठेपले आहेत. बिहार पोलीस कुठे, काय तपास करत आहे ह्याची बित्तम बातमी इलेक्ट्रोनिक मिडीयामध्ये झळकत आहे. बहुतेक बिहार पोलिसांची कामाची तीच पद्धत असू शकते, परंतु इलेक्ट्रोनिक मिडीयाच्या मार्फत सतत मुंबई पोलिसांवर आक्षेप नोदवला जात आहे, मुंबई पोलिसांनी केलेल्या तपासावर प्रश्न उपस्थित केला जात आहे. इलेक्ट्रोनिक मिडीयाच्या माध्यमातून सतत मुंबई पोलिसांवर आरोपाच्या फैरी झाळण्यात येत आहेत, कुठेतरी यामध्ये मुंबई पोलिसांवर दबाव टाकून हे प्रकरण सीबीआयकडे हस्तांतरित करण्याची जोरदार कवायत केली जात आहे असे स्पष्ट निदर्शनात येत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री श्री. अनिल देशमुख दोघांनीही सीबीआयकडे हे प्रकरण वर्ग करण्यास असहमती दर्शवलेली आहे. कायदा आणि कोर्ट योग्य ते पाऊल उचलतील.

आरुषी हेमराज हत्याकांड

आरुषी हेमराज हत्याकांड १५-१६ में २००८ ला दिल्लीमध्ये घळले होते त्या हत्याकांडाचे गूढ संपूर्ण देशाला लागले होते. त्या प्रकरणात देखील इलेक्ट्रोनिक मिडीयाच्या भूमिकेबद्दल खूप सारे प्रश्न उठवण्यात आले होते, संपूर्ण इलेक्ट्रोनिक मिडीयाने ह्या प्रकरणात ज्या पद्धतीने बातमी देण्याच्या नावाने सवंग चर्चा रंगवून असेच रान उठवून दिले होते. त्यावेळी देखील भारताच्या मध्यमवर्गीयांना आरुषी हेमराज हत्याकांड म्हणजे त्यांच्या घरावर झालेला हमला प्रतीत होत होता. ह्या प्रकरणात देखील सीबीआय कडे तपास सोपवण्याची मागणी केली गेली. सीबीआयने तपास केला देखील आणि परस्परविरोधी अहवाल जनतेसमोर आलेत त्यात नोकरांच्या केलेल्या नार्को टेस्ट मिडीयामध्ये लिक झाली. आरुषी हेमराज यांच्या हत्याकांडात तलवार दाम्पत्याच्या निजी आयुष्यावर चर्चा रंगवण्यात आल्यात, न्यूज अंकर स्वतः तपास करणारे अधिकारी बनून रंजक कथा रचून घटनाक्रम ओरडून सांगत होते. सीबीआय ने लावलेल्या तपासावर सीबीआयमधून आणि बाहेरून देखील अनेक प्रश्न चिन्ह उभे करण्यात आलेत. कोर्टात ह्या केसचा निकाल लागला ज्यांच्या थेअरीशी मिळताजुळता निकाल लागला त्यांनी न्याय झाला अशी भावना व्यक्त केली तर दुसरा वर्ग न्याय करण्याच्या नावावर बळीचा बकरा बनवला अशी भावना व्यक्त करत होता.

सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरण आरुषी हेमराज हत्याकांड प्रकरणाची पुनुरावृत्ती होते कि काय अशी शंका निर्माण होत आहे. फरक इतकाच आहे कि दिल्ली पोलीसानप्रमाणे मुंबई पोलिसांनी भोंगळपणा न दाखवता तत्परतेने आपले व्यावसायिक मापदंडाच्या अनुषंगाने कोविड संक्रमण काळातही जे-जे इनपुट येत गेले त्या दिशेने त्यांनी आपला तपास केला, म्हणूनच कि काय सीबीआय कडे हे प्रकरण वर्ग करता यावे म्हणून बिहार पोलीस आणि मुंबई पोलीस असा वाद उभा करून मुंबई पोलिसांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो आहे अशी भावना अनेकांच्या मनात निर्माण होत आहे.

0 comments on “सुशांतची वारी आरुषीच्या वाटेवर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *