Wednesday, 12 August, 2020

जाहिरात

बिहारी जनता पुराने त्रस्त ५० लाख लोक प्रभावित


बिहारचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात व्यस्त असतांना बिहारमध्ये पुराने हाहाकार माजलेला आहे. कोविड संक्रमणाचा एकीकडे उद्रेक होत आहे तसेच राज्याची आरोग्य व्यवस्थेवर बिहारची जनता व्हिडिओ वायरल करून प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे, ह्यात भर म्हणून बिहारमध्ये १४ जिल्ह्यांमध्ये पुराने हाहाकार माजवलेला आहे. पुराच्या तडाख्याने जवळ जवळ ५० लाख लोकं प्रभावित झाले असून १६ गुर आणि १३ लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे,

राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या मागील अहवालानुसार १४ जिल्ह्यातील १०४३ पंचायती मधील ४९.०५ लक्ष जनता हि ह्या पुराने प्रभावित झालेली आहे. मुझफ्फरपूर जिल्ह्यातून २, दरबंघा जिल्ह्यांमध्ये ७ तर वेस्ट चम्पारण जिल्ह्यांमध्ये ४ जणाचा बळी गेलेला आहे.

राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागानुसार राज्यामध्ये सरासरी ७६८.५ mm पाऊस झाला आहे जो सामान्य पाउसाच्या पेक्षा ४६% जास्त आहे म्हणूनच राज्यातील नद्या ह्या पूर रेषा ओलाडून वाहत आहेत. त्यातल्यात्यात नेपाळमध्ये ज्या नद्यांचा उगमस्थान आहे त्या नद्यामध्ये पुराचा उद्रेक जास्त आहे.

एक चातुर्थाश जनता हि इस्ट चम्पारण, सारण आणि गोपालगंज जिल्हातील आहे आणि हे तीनही जिल्हे एकमेकांना सलग्न आहेत.

२९ NDRF आणि SDRF च्या टीम बचावकार्य युद्धपातळीवर करत आहेत. आजपर्यंत ३.९२ लक्ष लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले असून २६,७३२ लोकानी १९ रिलीफ कॅम्प मध्ये आश्रय घेतला आहे. ह्या रिलीफ कॅम्प मध्ये सोशल डीस्टनसिंगचे सर्व नियमाचे पालन केले जाते असा दावा करण्यात आला आहे. १,३४० कॅम्युनीटी किचनच्या माध्यमातून ११ जिल्ह्यातील जवळपास ९ लक्ष लोकांना भोजन उपलब्ध करून देण्यात येत आहे.

कॅम्युनीटी किचन

0 comments on “बिहारी जनता पुराने त्रस्त ५० लाख लोक प्रभावित

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *