Wednesday, 12 August, 2020

जाहिरात

नंदुरबार करोना अलर्ट


नंदुरबार करोना अलर्ट

नंदुरबार जिल्ह्याचे कलेक्टर श्री. डॉ. रांजेंद्र भारुड यांनी नंदुरबार जिल्ह्याच्या १ ऑगस्ट रोजी घेण्यात आलेल्या स्वॅब टेस्टचा अहवाल सादर केल्या. अहवालानुसार एकंदर ४,३०८ स्वॅब टेस्ट घेण्यात आले होत्या, त्या पैकी ३,४१५ स्वॅब टेस्ट निगेटिव्ह आले आहेत तर ६४७ स्वॅब टेस्ट पॉझिटीव्ह आल्या असून त्या पैकी ३४ कोरोना बाधित रुग्णांचा दुर्दैवी मृतू झालेला आहे. पॉझिटीव्ह रुग्णावर उपचार सुरु आहेत, उपचारानंतर ३९८ रुग्ण संसर्गमुक्त झाले असून सध्याच्या स्थितीला १९६ कोरोना संक्रमित रुग्णांवर उपचार चालू आहेत. २३० रुग्णांचा स्वॅब टेस्ट अवहाल प्रलंबित आहे.

जिल्ह्यातील सर्वाधिक रुग्ण नंदुरबारचे

नंदुरबार तालुक्यातून एकूण २५७० लोकांचा स्वॅब टेस्ट अवहाल पाठवण्यात आला होता त्यापैकी २०२१ लोकांचे स्वॅब टेस्ट रिपोर्ट निगेटिव्ह आले असून ४०८ लोकांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. जिल्ह्यातील एकूण पॉझिटीव्ह रुग्णामध्ये नंदुरबारची सर्वाधिक पॉझिटीव्ह रुग्णाची संख्या आहे. नंदुरबारसाठी हि एक चिंतेची बाब आहे.

टिळक रोड, आंबेडकर चौक, रामनगर, परदेसीपूरा, गणपती रोड, लहान माळीवाडा, रायसिंगपूरा, जुनी सिंधी कॉलनी, आणि गणेश नगर धुळे नाका ह्या भागातून कोरोना संक्रमित रुग्ण मिळाले आहेत.

नंदुरबार करोना अलर्ट

0 comments on “नंदुरबार करोना अलर्ट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *