Wednesday, 12 August, 2020

जाहिरात

चीनची मुजोरी


पैंगोंग सो, देपसांग मधून चीनचा मागे हटण्यास नकार

पूर्व लडाखमधील भारत चीन यांच्यातील सीमा वादातून निर्माण झालेला तणाव कमी होतांना दिसत नाही आहे. पैंगोंग सो आणि देपसांग मधून चीनचे सैन्य ठाण मारून बसले आहे तर दुसरीकडे LAC वर अरुणाचलप्रदेश पर्यंत चीनी सैनिकांची संख्या दिवसागणिक वाढतच चाललेली आहे. हा वाद असाच हिवाळ्यातील कडाक्याच्या थंडीपर्यंत खेचून भारताला कोंडीत पकडण्याच्या चीनचा मनसुबा दिसून येत आहे म्हणून हा तणाव लांबणार म्हणूनच भारतीय सैन्य थंडीच्या नियोजनाच्या तयारीला लागले आहे.

शांतता वार्ता

पूर्व लडाखमधील तणावपूर्ण क्षेत्रामध्ये शांतता बहाल करण्यासाठी दोन्ही देशातील शीर्ष कमांडर पदाच्या अधिकाऱ्यामध्ये चार चरणात शांतात वार्ता करण्यात आल्या तसेच सुरक्षा सल्लागार श्री. अजित डोभाल आणि चीनचे विदेश मंत्री वांग यी यांनी टेलिफोनवर जवळ जवळ दोन तास चर्चा करून पूर्वी लडाखमधील दोन्ही देशातील तणाव कमी करण्याच्या हेतूने सैन्य मागे घेण्याचे मान्य केले होते. ह्या चर्चेनंतर ६ जुलै पासून सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया सुरु झाली होती.

चीनच्या पैंगोंग सो आणि देपसांग मधील हटवादी भूमिका लक्षात घेऊन भारताने १४ कॉर्प्स कमांडर लेफ्टिनेंट जनरल हरिंदर सिंह आणि चीनी मेजर जनरल लुई लिन यांच्यामध्ये होणारी पाचव्या चरणातील शांतता वार्ता जी ३० जुलैला प्रस्तावित होती टी वार्ता एका आठवड्यासाठी पुढे ढकलेली आहे.

चीनच्या भूमिकेमागील कारण

अधिकाऱ्याच्या हवाल्याने पैंगोंग सो आणि देपसांग मधून चीनच्या सैन्याने मागे न हटण्याचे मुख्य कारण म्हणजे १४ जुलैला झालेल्या चवथ्या चरणातील चर्चेनुसार जो डिसएगेजमेंटचा प्रस्ताव जो दोन्ही देशांच्या संमतीने पारित झाला होता त्याला लागू करण्यात चीनची द्विधा मनस्थिती दिसून येत आहे तर असेच शांतता वार्ता करत चीनला हिवाळ्यातील कडाक्याच्या थंडीचा फायदा उचलत भारताला कोंडीत पकडण्याची सुप्त इच्छा दिसून येत आहे.

एयरफोर्स आणि नेवी हाय-अलर्ट

चीनचा मनसुबा लक्षात घेऊन भारतीय हवाईदल आणि हिंद महासागरातील इंडियन नेवी अलर्टवर आहेत. भारतीय हवाईदल थंडीत LAC वर नियंत्रण ठेवण्यासाठी सज्ज होत आहे तर हिंद महासागरात इंडियन नेवी आक्रमक गस्त घालत आहेत. पूर्वी लडाखमधील तणाव लक्षात ठेवून दोन्ही दले कुठल्याही परिस्थितीला सामना देण्यासाठी सज्ज आहेत.  

0 comments on “चीनची मुजोरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *