Friday, 14 August, 2020

जाहिरात

अक्कलकुवा करोना अलर्ट


नंदुरबार जिल्ह्याचे कलेक्टर श्री. डॉ. रांजेंद्र भारुड यांनी नंदुरबार जिल्ह्याच्या १ ऑगस्ट रोजी घेण्यात आलेल्या स्वॅब टेस्टचा अहवाल सादर केल्या. अहवालानुसार एकंदर ४,३०८ स्वॅब टेस्ट घेण्यात आले होत्या, त्या पैकी ३,४१५ स्वॅब टेस्ट निगेटिव्ह आले आहेत तर ६४७ स्वॅब टेस्ट रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्या असून त्या पैकी ३४ कोरोना बाधित रुग्णांचा दुर्दैवी मृतू झालेला आहे. पॉझिटीव्ह रुग्णावर उपचार सुरु आहेत, उपचारानंतर ३९८ रुग्ण संसर्गमुक्त झाले असून सध्याच्या स्थितीला १९६ कोरोना संक्रमित रुग्णांवर उपचार चालू आहेत. २३० रुग्णांचा स्वॅब टेस्ट अवहाल प्रलंबित आहे.

अक्कलकुवा तालुक्यातील एकूण २८३ रुग्णाचे स्वॅब टेस्ट साठी पाठवण्यात आले होते त्यापैकी २६० रुग्णांचे स्वॅब टेस्ट अवहाल निगेटिव्ह आले असून १८ रुग्णांचे स्वॅब टेस्ट अवहाल पॉझिटीव्ह आलेला आहे. मुख्यत्त्व सर्वाधिक रुग्ण हे अक्कलकुवा नगर परिषदचे रहिवासी आहेत.

0 comments on “अक्कलकुवा करोना अलर्ट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *